पत्नीला माहेरी नेण्यासाठी आलेल्या जावयाला खडक्यात मारहाण : दोघांविरोधात गुन्हा


Beating the son-in-law who came to take his wife home with a stone : Crime Against Both भुसावळ : पत्नीला माहेरी नेण्यासाठी आलेल्या जावयाला तालुक्यातील खडका येथे लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना 8 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा
विनोद गुलाबसिंग गायकवाड (35, उत्तरानगरी, चिखलठाणा, एमआयडीसी, औरंगाबाद) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची सासरवाडी खडका येथील आहे. रविवार, 8 रोजी सकाळी 10 वाजता ते पत्नीला सासरी नेण्यासाठी आल्यानंतर संशयीत आरोपी मुकेश राजू पवार व सुनील राजू पवार (खडका, ता.भुसावळ) यांच्यात जोरदार भांडण झाले व मुकेश यांनी हातातील कड्याने तर सुनील यांनी लाकडी दांड्याने उजव्या पायाच्या पंजावर मारहाण करीत जखमी केले. तपास सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक योगेश पालवे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !