पाटणादेवी येथील चंडिकादेवी मंदिरातील दानपेटी फोडली


चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथील चंडिका देवी मंदिराची दानपेटी फोडून त्यातील अंदाजे दिड लाखांच्या रोकडसह दानपेटीच चोरट्यांनी लांबवल्याची बाब 13 रोजी रात्री 12.30 ते 3.30 दरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असून त्याआधारे संशयीतांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास चाळीसगाव ग्रामीणचे सहा.निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !