उच्च शिक्षणासाठी पायाभूत गणित व विज्ञान संकल्पना समजायला हव्यात : डॉ.पी.एस.कोळी
भुसावळ : शिक्षणासाठी राज्य केंद्रीय व आंतरराष्ट्रीय असे विविध बोर्डाचा अभ्यासक्रम आहे. त्यात काठीण्य पातळी कमी-अधिक असल्याने राज्य अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून जास्तीत-जास्त सराव करून घेत त्यामधील संकल्पना स्पष्ट केल्या पाहिजे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागून सखोल अभ्यास करण्यावर ते भर देतील शिवाय दहावी व बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी खालील इयत्तेतील पायाभूत गणित व विज्ञानाच्या संकल्प विद्यार्थ्यांच्या स्पष्ट असल्या पाहिजे, असे मत किन्हीतील सर्वोदय हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक डॉ.पी.एस.कोळी यांनी व्यक्त केले.
गणित, विज्ञान कार्यशाळेत मार्गदर्शन
श्री र.न मेहता प्राथमिक विद्यामंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका रीता शर्मा, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे व्हा.चेअरमन सुनील वानखेडे, उषा नॅशनल टेक्नो रीसर्च सायन्स सेंटरचे चेअरमन जीवन महाजन, संचालक तेजेंद्र महाजन यांनी गणिताच्या विविध क्लुप्त्या व दररोजच्या जीवनातील विज्ञान यावर प्रात्यक्षिक करून दाखवले. सूत्रसंचालन दीपक कुलकर्णी यांनी करून आभारही मानले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
