भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात वाहतूक सुरक्षा अभियान
भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त शहर वाहतूक शाखेच्या वतीने लोणे यांनी विद्यालयातील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या संदर्भातील नियमांची तपशीलवार माहिती शुक्रवार, 13 रोजी दिली. रस्त्याने चालताना व वाहन चालवतांना आपण कोणकोणती खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रमण भोळे, ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक, सुहास चौधरी तसेच वाहतूक शाखेतील भाऊसाहेब पाटील व तडवी यांची उपस्थिती होती.


