गाडर्‍यातील बेपत्ता महिलेचा अखेर मृतदेहच लागला हाती


The body of the missing woman in the car was finally found यावल : तालुक्यातील गाडर्‍या येथील बेपत्ता महिलेचा जंगलात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झाले नसलेतरी पोलिसांकडून याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. करसना सुभाष बारेला (30, गाडर्‍या, ता.यावल) असे मृत महिलेचे नाव आहे.

बेपत्ता प्रकरणी पोलिसात होती नोंद
करसना बारेला या आपल्या परीवारासह वास्तव्याला होत्या. 9 जानेवारीपासून त्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने याबाबत गुरूवार, 12 जानेवारी रोजी यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान या महिलेचा मृतदेह गाडर्‍या जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी गाडर्‍या गावाचे पोलीस पाटील केरसिंग घाटु बारेला यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !