जळगावात अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संभोग : तरूणाविरुद्ध गुन्हा !


जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संभोग जळगाव शहरात 12 रोजी रात्री 11.30 वाजता घडली. या प्रकरणी एका 28 वर्षीय विकृत तरूणाविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा
जळगाव तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी वास्तव्यास असून शिक्षणानिमित्त त्याचे जळगावात येणे-जाणे आहे. संशयीत आरोपी गुड्डू (नाव पूर्ण माहित नाही, वय 28) याने 12 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. दुसर्‍या दिवशी पीडीत विद्यार्थ्याने रामानंद नगर पोलीस स्थानक गाठत तक्रार दिल्याने पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय गोपाल देशमुख करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !