रावेर लोकसभा क्षेत्रात रस्त्यांच्या कामासाठी 37 कोटींच्या निधीला मंजुरी
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश : लवकरच कामे होणार सुरू
37 crore fund sanctioned for road works in Rawer Lok Sabha constituency मुक्ताईनगर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत चोपडा, यावल, रावेर, भुसावळ व जामनेर तालुका अंतर्गत ग्रामीण भागातील 49 किलोमीट अंतराच्या एकूण आठ रस्त्यांच्या कामासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी 36.76 कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते कात टाकणार असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या रस्त्यांची होणार कामे
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमध्ये चोपडा तालुक्यातील 17 किलोमीटर अंतराच्या तीन रस्त्यांसाठी 12.79 कोटी, यावल तालुक्यात 7.22 किलोमीटर अंतराच्या एका रस्त्यासाठी 5.60 कोटी, रावेर तालुक्यात सहा किलोमीटर अंतराच्या एका रस्त्यासाठी 4.72 कोटी, भुसावळ तालुक्यात 5.46 किलोमीटर अंतराच्या एका 1रस्त्यासाठी 3.54 कोटी आणि जामनेर तालुक्यातील 12.73 किलोमीटर अंतराच्या दोन रस्त्यांसाठी 10.42 कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे. रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरू होईल, अशी माहिती खासदारांच्या संपर्क कार्यालयाने दिली आहे.
