फैजपूरात वाळूची चोरटी वाहतूक : डंपर मालकासह तिघांना अटक
Stealth transport of sand in Faizpur : Three arrested including dumper owner फैजपूर : वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणार्या डंपर मालकासह तिघांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
फैजपूर पोलिस ठाण्याचे हवालदार भिवसेन नमायते व अधिकारी गस्तीवर असताना मसाका कारखान्याजवळून 13 रोजी रात्री सव्वाबारा वाजता डंपरमध्ये वाळू वाहून नेली जात असताना चालकाकडे वाळूचा परवाना विचारल्यानंतर तो आढळला नाही. या प्रकरणी नमायते यांनी तक्रार दिल्यावरून मयूर सुरेश कोळी (30, डांभूर्णी), डंपर मालक तेजस मोहन कोळी (19, डांभूर्णी) व ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव कोळी (34, कोळन्हावी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेश बर्हाटे करीत आहेत.


