मलकापूरातील महिलेसह दोघांचे अपहरण : भुसावळातील आरोपी जाळ्यात

पैशांच्या वादातून घटना ; संशयीत आरोपींनी मलकापूर शहरात घराची केली तोडफोड


Kidnapping of two including a woman in Malkapur: Accused in Bhusawal in the net मलकापूर : शहरातील विवाहित महिलेसह तिच्या भावाचे अपहरण करण्यात आल्यानंतर आरोपींनी घराची तोडफोड केल्याचा प्रकार मलकापूरातील अशोक नगरात 6 जानेवारी 2023 रोजी घडला होता. या प्रकरणी मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यप्रदेशसह भुसावळातील आठ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

घरात घुसून केली तोडफोड
गुन्ह्याबाबत पोलिस सूत्रांची माहिती अशी की, अशोक नगरात गजानन ठोसर हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. ठोसर कुटूंबियांचा पैशांसंदर्भात भुसावळातील संशयीतांशी व्यवहार झाला असल्याने संबंधित पैशांचा तगादा लावत होते मात्र पैसे न मिळाल्याने 5 जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता 1) रंजना लोधी, 2) रक्षा लोधी, 3) रामवतार रघुनाथ लोधी (शिवदत्त नगर, भुसावळ), 4) मुन्ना व अन्य तीन अनोळखींनी ठोसर यांच्या घरात शिरून साहित्याची तोडफोड केली तसेच गजानन ठोसर यांच्या पत्नी रुपाली गजानन ठोसर व त्यांचा भाऊ शिवम श्रीनाथ यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले.



पोलिसांनी केली महिलेसह दोघांची सुटका
महिलेसह तिच्या भावाचे अपहरण झाल्यानंतर वैशाली रत्नापारखी (28, मराठा मंगल कार्यालयाजवळ, मलकापूर) यांनी मलकापूर पोलिसात 6 जानेवारी रोजी तक्रार नोंदवल्यानंतर सात संशयीतांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप, पोलिस शिपाई यशवंत पाटील, गोपाल तारुळकर ,शेख आसीफ, प्रमोद राठोड आदींच्या पथकाने मराठवाड्यातील भोकरदन-औरंगाबाद दरम्यान शिवारात विवाहित महिला व तिच्या भावाचा तपास लावत आरोपींच्या तावडीतून त्यांची सुटका केली.

या आरोपींना केली अटक
पोलिसांनी अपहरण प्रकरणी रामावतार रघुनाथ लोधी (शिवदत्त नगर, भुसावळ) व मुन्ना विरसिंह जमरे (रा.हेलपाडावा चौपाले, जि.खरगोन) यांना सुरूवातीला अटक केल्यानंतर अन्य संशयीत उमेश हरीभाऊ ठाकरे (29, रा.मसूला, ता.मंगळूरपीर, जि.वाशिम), राहुल उत्तम माने (26, खानापूर, जि.सांगली), हर्षवर्धन संभाजी चव्हाण (29, वेडराव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर), रेवलसिंग भावसिंग मंडलोई (28, हेलापाडावा, झिरण्या, जि.खरगोन (म.प्र) व रंजना हेमनारायण लोधी (39), रक्षा लोधी (दोन्ही रा.शिवदत्त नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. आठही आरोपींची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रतनसिंह बोराडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !