रावेर तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा


Violence of a married woman in Rawer Taluka : crime against both रावेर : रावेर तालुक्यातील पाडळे येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा विनयभाग करण्यात आला. या प्रकरणी रावेर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जाब विचारताच केली शिविगाळ
शुक्रवार, 13 रोजी रोजी दुपारी 12 व रात्री नऊ वाजता संशयीत आरोपीने अनधिकृतपणे विवाहितेच्या घरात प्रवेश करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत विनयभंग केला शिवाय या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी जाब विचारल्यानंतर संशयीत आरोपींनी कुर्‍हाडीसह फावडे घेवून तक्रारदाराच्या दारात येत शिविगाळ केली. या प्रकरणी संशयीत आरोपी अकील हबीब तडवी (22) व मनोज हबीब तडवी (26, दोन्ही रा.पाडळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !