विटनेर शिवारातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


A 14-year-old minor girl was lured away from Witner Shiwar जळगाव : शेतात रखवाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍यार कुटूंबाती 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याची घटना जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारातीत शेतात घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शनिवार, 14 जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिनाभरानंतर तक्रार केली दाखल
जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारातील एका भागात अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. 24 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतली नाही. महिनाभरापासून तिचा सर्व शोध सुरू असतानाही मुलगी न आढळल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !