हिंगोण्यातील शाकंभरी माता मंदिरातील दानपेटीतून अडीच लाखांचा ऐवज लंपास


Two and a half lakhs in lieu of donation from the donation box of Shakambhari Mata temple in Hingone चाळीसगाव : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिराकडेच चोरट्यांनी आपला मोर्चा वळवल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदिरात झालेल्या चोरीनंतर चोरट्यांनी हिंगोण्यातील शाकंभरी माता मंदिरातील दानपेटी फोडत दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे येथे शाकबंरी मातेचे मंदिर असून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री 9.30 ते शनिवार, 14 रोजीच्या सकाळी सहा दरम्यान दानपेटीतील दोन लाखांची रोकड तसेच 20 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या नथ, पाच हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या टिकल्या, 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल, भवानी माता मंदिरातील पाच हजारांची रोकड असा एकूण दोन लाख 45 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पोलिस पाटील ज्ञानेश्वर मोहन चव्हाण (42, हिंगोणे खुर्द) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !