निंभोरा बु.॥ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात


निंभोरा बु.॥ : कृषी तंत्र विद्यालयात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ अव युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी कृषी तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे व ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांची उपस्थिती होती. राजीव बोरसे यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांना पटवून सांगितले तसेच प्रल्हाद बोंडे यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला उजाळा दिला. प्रसंगी विशाल पाटील, भावना भालेराव, आरती कोळी, नेहा गाढे, निशा इंगळे, कांचन भालेराव आदी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जितेंद्र भावसार, जितेंद्र कोळंबे, धनराज बावस्कर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन विवेक बोंडे तर आभार संदीप महाजन यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !