भुसावळ जेसीआयचा भुसावळ ताप्तीचा पदग्रहण सोहळा उत्साहा

अध्यक्षपदाचा रजनी सावकारे तर सचिवपदाचा जयश्री अग्रवालांनी घेतला पदभार


भुसावळ : जेसीआय भुसावळ ताप्ती चा पदग्रहण समारंभ नुकताच स्टार रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे तसेच जेसीआयचे झोन प्रेसिडेंट जितेंद्र बोरा व सेक्रेटरी कुशल झवर उपस्थित होते. यावेळी मावळत्या अध्यक्षा ज्योती दरगड यांच्याकडून नूतन अध्यक्षा रजनी सावकारे यांनी तर सेक्रेटरी निशा मंडलेचा यांच्याकडून जयश्री अग्रवाल यांनी पदभार स्विकारला.

विविध कार्यक्रम राबवणार
नूतन अध्यक्ष रजनी सावकारे यांनी येणार्‍या वर्षात विविध कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली. यावेळी जेसीआयच्या झोन ऑफीसर संगीता अग्रवाल, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सचिव लता सोनवणे, मनिषा काकडे, सरला सावकारे, अनिता आंबेकर तसेच सुरतहून रजनी सावकारे यांचे वडील रामदास बावस्कर, डॉ.रश्मी शर्मा, राजीव शर्मा, विकास पाचपांडे, इनरव्हील क्लब रेलसिटीच्या अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, इनरव्हील ब्लॉसमच्या अध्यक्ष रीतीका हेडा, रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या अध्यक्षा नूतन फालक, रत्नाकांता अग्रवाल आदी मान्यवर व क्लबच्या सदस्या दीपा पटेल, मोनिका अग्रवाल, आभा दरगड, सुनीता अग्रवाल, हेमा बेहरा, वर्षा जैन, रीया छाबडा, प्रिया छाबडा, श्रृती लाहोटी, डॉ.निलेश झंवर, ऋचा अग्रवाल, नम्रता चोरडीया, निकीता अग्रवाल, पल्लवी झोपे, सुनीता दरगड, दीपिका दरगड, रेखा व्यास, सुचित्रा अग्रवाल, योगीता झंवर, विकास पाचपांडे, हिरामण फालक, अ‍ॅड.कल्पना टेमाणी, प्रतीक्षा पाटिल, मीनाक्षी धांडे व महिला वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन डॉ.सोनल झंवर तर आभार जयश्री अग्रवाल यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !