जळगावातील विवाहितेचा 10 लाखांसाठी छळ : पतीसह चौघांविरोधात गुन्हा
Harassment of married woman for 10 lakhs in Jalgaon : Crime against four including husband जळगाव : घर घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये न आणल्याने जळगावातील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील रामनगर येथील माहेर असलेल्या पूजा विजय लाड यांचा विवाह पुणे येथील विजय उखर्डा लाड यांच्याशी झाला असून लग्नाच्या सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती विजय लाड यांनी विवाहितेला माहेरहून 10 लाख रुपये घर बांधण्यासाठी आणण्याची मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे देण्यास नकार दिल्याने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली तर सासु-सासरे व दीर यांनीदेखील पैशांसाठी तगादा लावत छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर विवाहिता माहेरी आल्या. शनिवारी दुपारी त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पती विजय उखर्डा लाड, सासू शारदा उखर्डा लाड, सासरे उखर्डा तुकाराम लाड, दीर संजय तुकाराम लाड (सर्व रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


