चाळीसगाव खूनाने हादरले : 35 वर्षीय तरुणाची हत्या
Chalisgaon rocked by murder: 35-year-old man killed चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील पोदार शाळेजवळ 35 वर्षीय तरुणाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब रविवार, 15 रोजी सायंकाळी सात वाजता उघडकीस आल्याने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिनेश उर्फ भावडू पवार (35) असे मयताचे नाव आहे.
पूर्व वैमनस्यातून हत्येचा संशय
रविवारी सर्वत्र संक्रांतीचा उत्साह असताना शहरातील पोदार शाळेजवळ दिनेश पवार हा तरुण आल्यानंतर काही संशयीतांनी धारदार चाकूचे वार करीत त्याची हत्या केली. अतिरक्तस्त्रावामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खुनाची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शहरचे निरीक्षक के.के.पाटील व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. खून करणार्या आरोपींना निष्पन्न करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


