चाळीसगाव-कन्नड रोडवर अपघातात पादचार्‍याचा मृत्यू : अज्ञात चालकाविरोधात गुन्हा


Pedestrian dies in an accident on Chalisgaon-Kannad Road : Case against unknown driver चाळीसगाव : पादचार्‍याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव-कन्नड रोडवर हा अपघात घडला होता.

पादचार्‍याला अज्ञात वाहनाने उडवले
भडगाव येथील चिंतामण नारायण महाजन (65) हे 3 जानेवारी रोजी रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव कन्नड रोड ओलांडून पायी जात होते. त्यात अचानक भरधाव वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यावर लागलीच औषधोपचारकामी त्यांना धुळे येथे हलविण्यात आले. त्यांच्यावर मागील आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना 11 जानेवारी रोजी सायंकाळी 7:50 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नाईक मनोज पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !