भुसावळात प्रतिबंधीत नायलॉन मांज्याची विक्री : विक्रेत्याविरोधात गुन्हा
Sale of prohibited nylon mats in Bhasawal: Crime against seller भुसावळ : राज्यात नायलॉन मांज्याच्या वापरासह विक्रीवर बंदी असलीतरी शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीत त्याची विक्री होत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. गुरुनानक नामक दुकानातून दोन हजार 750 रुपयांचा प्रतिबंधीत मांजा व चक्री जप्त करण्यात आल्याने मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी कॉन्स्टेबल योगेश माळी यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी व दुकानदार करण दिलीपकुमार लुल्ला (21, आदर्श हायस्कूलसमोर, सिंधी कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक निलेश चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी आदींच्या पथकाने केली.


