भुसावळात एकाचा अपघाती मृत्यू : वाहन चालकाविरोधात गुन्हा


Accidental death of one in Bhusawal : Crime against the driver भुसावळ : भरधाव चारचाकीच्या धडकेने साकेगाव येथील 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चारचाकी चालकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल
धीरज केशरसिंग जाधव (73, मोरेश्वर नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, योगेंद्र अशोक न्हावी (मोरेश्वर नगर, भुसावळ) यांनी भरधाव चारचाकी (एम.एच.19 सी.यु.1958) भरधाव वेगाने चालवत कन्हैय्या डालूराम कोचले (32, साकेगाव) यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान मृत पावले होते. हा अपघात 12 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता घडला होता. या प्रकरणी वाहन चालक कोचले विरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !