भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह चौघांविरोधात गुन्हा


Harassment of married woman in Bhusawal : Crime against four including husband भुसावळ : लग्नात हुंड्याचे पैसे कमी दिले तसेच सोन्या-चांदीच्या वस्तू कमी दिल्यात म्हणून शहरातील माहेर व जळगावातील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

या संशयीत आरोपीविरोधात गुन्हा
समीराबी शरीफ तडवी (25, इच्छादेवीमागे, जळगाव, ह.मु.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, लग्नात हुंड्याचे पैसे व दागिणे कमी दिले म्हणून व माहेरून पैसे न आणल्याने आरोपींनी विवाहितेचा शारीरीक मानसिक छळ केला तसेच विवाहितेस ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पती शरीफ बाबू तडवी (32), सासरे बाबू छबू तडवी (55), सासू शबनम बाबू तडवी (50), जेठानी नसीबा सलीम तडवी (30, इच्छादेवीमागे, पंचशील नगर, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक महेश एकनाथ चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !