भुसावळात जय मातृभूमी मंडळातर्फे दिड हजार बालकांना पतंग वाटप

उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष : नॉयलॉन मांजा न वापरण्याचे माजी नगरसेवक किरण कोलते यांचे आवाहन


भुसावळ : शहरातील जय मातृभूमी मंडळातर्फे यंदादेखील शहरातील दिड हजार बालकांना मोफत पतंग वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, उद्योगपती मनोज बियाणी, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, रमाकांत महाजन, मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते आदी उपस्थित होते.

सहा वर्षांपासून मोफत पतंग वितरण उपक्रम
शहरातील जय मातृभुमी मंडळातर्फे गेल्या सहा वर्षांपासून मोफत पतंग वितरण केले जाते. रविवारी मातृभुमी चौकात आमदार संजय सावकारे व मान्यवरांच्या हस्ते बालकांना प्रत्येकी दोन पतंगांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात तब्बल दीड हजार बालकांना तीन हजार पतंग वितरण करण्यात आले. यासाठी खास गुजरातमधून पतंग खरेदी करण्यात आले होते. जय मातृभुमी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते, सीआरएमचे झोनल सचिव किशोर कोलते, प्रवीण पाटील, प्रशांत महाजन, पप्पु राणे, पिंटू बर्‍हाटे, मुकेश मोरे, किरण बढे, कृणाल पाटील, शैलेश वारके, गुरुदेव वारके, सुरेश हिवरकर आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !