चाळीसगावातील तरुणाची हत्या : पाच आरोपींना अटक
Murder of youth in Chalisgaon: Five accused arrested चाळीसगाव : शहरातील दिनेश उर्फ भावडू वाल्मिक जाधव (28, पवारवाडी, चाळीसगाव) या तरुणाच्या खून प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी पोलिस बंदोबस्तात मृत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. .
भर दिवसा केली तरुणाची हत्या
चाळीसगाव शहरातील पोदार शाळेजवळ रविवार, 15 रोजी सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास दिनेश उर्फ भावडू वाल्मिक जाधव (28) हा त्याचा मित्र निखील राजपूतसोबत गप्पा मारत असताना संशयीत अंकित महेंद्र मोरे, संकेत महेंद्र मोरे, अनिकेत महेंद्र मोरे, मुकेश उर्फ भुर्या मोरे (सर्व रा.हनुमानवाडी, चाळीसगाव), रोहित उर्फ पावट्या अशोक गवळी (शिवाजी चौक), हर्षल दीपक राठोड (रा.जुना मालेगाव रोड), शाम उर्फ भोला पूर्ण नाव माहित नाही व इतर पाच अनोळखींनी दुचाकीसह बुलेटवर येवून बुलेट व मोटारसायकलवरयेत दिनेश जास्त मातला असून याचा काटा काढावा लागेल, असे म्हणत शिविगाळ केली तसेच दोघा-तिघांनी त्यांच्या हातातील चाकूने दिनेशच्या गळ्याच्या खाली, छातीवर व पोटावर वार केले तर अन्य आरोपींनी लाथाबुक्यांनी व लाकडी दांड्यांनी मारहाण केल्याने जागीच दिनेशचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात वरील आरोपींविरोधात मयताचे वडील वाल्मीक रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खुनाला दोन गटातील पूर्ववैमनस्याी किनार असल्याचे बोलले जात आहे. तपास निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.


