बोरीच्या झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या : चाळीसगाव तालुक्यातील घटना
Youth commits suicide by hanging himself from a bori tree : incident in Chalisgaon taluka चाळीसगाव : तालुक्यातील तरवाडे येथील मनोज राजेंद्र पाटील (40) या तरुणाने आपल्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शेती व्यवसाय व खाजगी नोकरी करून करीत उदरनिर्वाह करणार्या तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही.
ग्रामीण पोलिसांनी घेतली धाव
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करीत पंचनामा केला.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.


