भादली बु.॥ येथून पाच हजारांची ट्रॅक्टरची बॅटरी लांबवली
Bhadli B. A five thousand tractor battery was extended from here नशिराबाद : भादली गावाजवळील नशिराबाद रस्त्यावरील गुरांच्या खळ्याजवळून ट्रॅक्टरची पाच हजारांची बॅटरी चोरट्यांनी लांबवली. ही घटना 26 ते 27 डिसेंबर रोजी घडली मात्र या प्रकरणी सोमवारी दुपारी नशिराबाद पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
देविदास माधव कोल्हे (39, ग्रामपंचायत कार्यालयजवळ, भादली बु.॥)हे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्यात जागेत त्यांनी खळा तयार केला असून ते ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.19 डी.व्ही.3987) उभे केले असतांना अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची पाच हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवली. 26 ते 27 डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला असलातरी सोमवार, 16 जानेवारी रोजी नशिराबाद पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार नूर खान करीत आहे.


