खामखेड्यातील तरुणाचा पूर्णा पात्रात आढळला मृतदेह
The body of a young man from Khamkheda was found in a full container मुक्ताईनगर : तालुक्यातील खामखेडा येथील तरुणाचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात सोमवारी आढळला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रवींद्र पांडूरंग सपकाळे (37, खामखेडा, ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे.
वेडाच्या भरात तरुण पडला बाहेर
रवींद्र हा तरुण वेडाच्या घरातून बाहेर पडला होता व त्याचा सर्वत्र शोध सुरू होता मात्र सोमवारी खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमानमंदिराजवळ पूर्णा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार रघुनाथ पवार करीत आहेत.


