भुसावळात झाडाचा पाला तोडण्यास सांगितल्याने एकास मारहाण


A man was beaten up for asking him to cut a leaf of a tree in Bhasawal भुसावळ : सुळबाभूळ झाडाचा पाला तोडण्यास सांगितल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा
तक्रारदार भास्कर हरीभाऊ पन्हाड (66, यशवंत नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, महेंद्र भगवानदास वैष्णव यांनी भास्कर यांना शेताजवळ सुळबाभूळ झाडाचा पाला तोडण्यास सांगितल्याने त्याचा राग येवून संशयीत पवन महेंद्र वैष्णव (यशवंत नगर, यावल रोड, भुसावळ) यांनी शिविगाळ करीत विळा बांधलेल्या काठीने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवार, 16 रोजी दुपारी 12 वाजता घडली. या प्रकरणी पवन वैष्णव विरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !