डाऊन पाटलीपूत्र एक्स्प्रेसमधून 56 हजारांचा ऐवज असलेली बॅग लांबवली


A bag containing 56 thousand was extended from Down Patliputra Express भुसावळ : एलटीटी-पटना प्रवास करणार्‍या प्रवाशाची डाऊन पाटलीपूत्र एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 56 हजारांचा ऐवज असलेली बॅग लांबवली. नाशिक रेल्वे स्थानक येण्यापूर्वी ही घटना घडली. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो नाशिक लोहमार्गला वर्ग करण्यात आला.

प्रवासी झोपल्याची चोरट्यांनी साधली संधी
आरीफ हुसेन आसीफ हुसेन (32, ओझो, पैलू, रबीगंज, जि.औरंगाबाद, बिहार) हे एलटीटी ते पटना असा प्रवास 12141 डाऊन पाटलीपूत्र एक्स्प्रेसच्या बी- 1 बोगीतील बर्थ क्रमांक 39 वरून करीत असताना चोरट्यांनी नाशिक रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांची निळ्या रंगाची बॅग लांबवली. या बॅगेत 12 हजार रुपय किंमतीचे सोन्याचे लॉकेट, 35 हजार 700 रुपये किंमतीची सोन्याची बाही, अडीच हजार रुपये किंमतीचे नवीन जीन्स पँट व शर्ट, जुने वापरते कपडे, आधार, पॅन कार्ड व लायसन्स असा एकूण 56 हजार 200 रुपयांचा ऐवज होता. या गुन्ह्याचे कार्यक्षेत्र नाशिक रोड असल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !