अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगार दाऊद नाशिक कारागृहात स्थानबद्ध


Dawood, a notorious criminal from Amalnera, lodged in Nashik Jail अमळनेर : जबरी लूटसह हाणामारी, दरोडा यासह तब्बल वेगवेगळे 27 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगार दाऊद याला जिल्हाधिकारी शुभम उर्फ दाऊद मनोज देशमुख (24, पिंपळरोड रोड, संविधान चौक, अमळनेर) यास स्थानबद्ध (एमपीडीए) करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आदेशानंतर संशयीताची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

अमळनेर पोलिसांनी तयार केला प्रस्ताव
कुविख्यात दाऊदची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच वेगवेगळ्या एकुण 27 गंभीर गुन्हे पाहता अमळनेर पोलिसांनी संशयीताला स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला. या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी चौकशी पूर्ण करून 3 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठवण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी 18 रोजी त्याबाबत आदेश काढले. अट्टल गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (24) यास पथकाने ताब्यात घेवून त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.



यांनी केली कारवाई
जळगाव स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, दीपक माळी, रवींद्र पाटील, किशोर पाटील, सिध्दार्थ शिसोदे, अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे यांनी गुन्हेगाराला अटक करीत त्याची नाशिक कारागृहात रवानगी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !