भुसावळातील मुस्लीम कॉलनीत घरफोडी : 42 हजारांचा ऐवज लंपास
Burglary in Muslim Colony in Bhusawal: 42 thousand instead of loot भुसावळ : शहरातील मुस्लीम कॉलनीत चोरट्यांनी घरफोडी करीत 42 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
शहरातील मुस्लीम कॉलनीत मोहम्मद सिद्दीक खान हे कुटुंबासह वास्तव्यास असून ते कामानिमित्त भाईंदर येथे नातेवाईकांकडे गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 16 ते 17 जानेवारीदरम्यान चोरट्यांनी बंद घरातून 26 हजारांची रोकड, सहा हजारांची सोन्याची अंगठी, दहा हजारांचे पायातील बिचवे असा एकूण 42 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी खान यांचे जावई आरीफ हैदर पिंजारी (45, आदर्शनगर, पारोळा) यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.


