भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात 21 रोजी माजी विद्यार्थी मेळावा

माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजन : 2016-22 दरम्यानचे विद्यार्थी होणार सहभाग


भुसावळ : शहरातील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शनिवार, 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता महाविद्यालयातील वाचनकक्षात करण्यात आले आहे. या मेळाव्यात 2016 ते 2022 दरम्यान शिक्षण घेतलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती
मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी व इंग्रजी विषयात गोल्ड मेडलप्राप्त शिबा खान हिच्याहस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी डॉ.मोहन फालक असतील. प्रमुख पाहुणे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि माजी विद्यार्थी महेश फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संजयकुमारजी नाहाटा तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच. बर्‍हाटे, उपप्राचार्य आणि माजी विद्यार्थी डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, कबचौउमवि अधिसभा सदस्य आणि माजी विद्यार्थी प्रा.ई जी.नेहते, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील, सचिव प्रा.डॉ.जी आर वाणी, मेळावा समन्वयक डॉ.आशिष चौधरी असतील. या मेळाव्यात 2016 ते 2022 पर्यंत पदवी व पदव्युत्तर परीक्षा पास झालेले सुमारे 156 माजी विद्यार्थी सहभागी होतील, असा अंदाज आहे. या सर्व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.



माजी विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन
दिवसभरातील या मेळाव्यात पुढील महिन्यात येऊ घातलेल्या नॅक पीअर टीमचा माजी विद्यार्थ्यांशी जो संवाद होणार आहे या विषयावर, तसेच माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाकडून आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून कोणत्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा कशा पूर्ण कराव्यात ? कोणकोणती पावले उचलली जावी? या विषयावर चर्चा केली जाणार आहेत. माजी विद्यार्थ्यांचा ओळख परीचय हा एक स्तुत्य उपक्रम या मेळाव्यात घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी 2016 ते 2022 मध्ये पदवी व पदव्युत्तर परीक्षा पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील, प्रा.दीपक पाटील, प्रा.चंद्रकांत सरोदे, प्रा.डॉ.गौरी पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी प्रा.स्मिता बेंडाळे (मो.नं- 7588687960), प्रा.स्वाती शेळके (9970236557) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !