वरणगाव शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे वितरण
भुसावळ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे वितरण बुधवार, 18 रोजी वरणगाव शहरातील शासकीय-निमशासकीय कार्यालयात वरणगाव शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले.
मराठी माणसासाठी सर्वप्रथम उचलला आवाज
मराठी मनाचा मानबिंदू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. देशविघातक कृत्य घडवणार्यांना धर्मांधाना या देशात राहण्याचा अधिकार नाही. तसेच मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम आवाज उठवला. या सर्व गोष्टींचा पूर्व इतिहास आणि त्यांचे कार्य हे शासकीय कार्यालयात गेल्यानंतर प्रतिमांच्या माध्यमातून लोकांना समजायला पाहिजे. हा उद्देश असल्याने या प्रतिमांचे वितरण केल्याचे शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी यावेळी सांगितले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद शेख, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, सतीश जैन, विक्की मोरे, उपशहर प्रमुख राम शेटे, अशोक शर्मा, शिवा भोई, प्रल्हाद माळी, प्रवीण वाकोळे, नंदू खराटे, संजय खराटे, नितीन बोदडे, इरफान शेख, उमाकांत झांबरे, अमोल कोळी, दीपक माळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.