महसूल पथकाला ट्रॅक्टरद्वारे चिरडण्याचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !
An attempt to crush a revenue team with a tractor; Crime against six people in Parola police ! More about attempt पारोळा : अवैध वाळू माफियांची मुजोरी दिवसागणिक वाढतच असून प्रशासनाकडून कारवाईसाठी तालुक्यातील करमाड बुद्रुक येथील बोरी पात्रात गेललेया पथकाच्या अंगावरच वाळू माफियांनी ट्रॅक्टर घालत चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार संतापजनक मंगळवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी पारोळा पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रॅक्टर अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न
नदीपात्रात चार विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आले. त्यावेळी पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाळू तस्करांनी पथकाला दमदाटी केली. त्यातील एक ट्रॅक्टर जागेवर थांबले व त्यावरील चालक पळून गेला. दुसरे लाल रंगाचे स्वराज कंपनीचे विना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह न थांबता, चालकाने पथकातील सदस्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. नंतर हा चालक वाहनासह पसार झाला. नंतर मागून दोन येणारे ट्रॅक्टर पथकाने थांबवले. त्यावरील चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाले तर ट्रॅक्टरजवळ संशयीत राकेश मधुकर पाटील (रा.करमाड बुद्रुक) व आनंदा देशमुख (रा.कुंझर, ता.चाळीसगाव) व चार अनोळखी हे हातात काठ्या व दगड घेऊन आले. तसेच सर्वांनी पथकाला दमदाटी व शिविगाळ केली. संबंधितांना पथकाने ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेण्याची सूचना केली मात्र संशयीतांनी वाळू रस्त्यावर उपसून वाहनासह पळ काढला. याप्रकरणी राकेश पाटील व आनंदा देशमुख यांच्यासह इतर अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


