धरणगाव तालुका हादरला : अल्पवयीन मुलीवर पित्यानेच केला अत्याचार
Dharangaon taluka shaken: A minor girl was abused by her father धरणगाव : धरणगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीवर पित्यानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पित्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीतेच्या नशिबी यातनाच
धरणगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन तरुणीचा यावल शहरातील तरुणाशी विवाह करून देण्यात आला मात्र पती रोज मारहाण करीत असल्याने त्यास कंटाळून पीडीता सुरत येथे कुणालाही न सांगता निघून गेली. पोलिसांनी पीडीतेचा शोध लावल्यानंतर तिला जळगावातील बालकल्याण समितीकडे सोपवले. सुमारे दोन महिने समितीकडे राहिल्यानंतर पीडीता आई-वडिलांकडे परतली मात्र पीडीतेच्या वडिलांनी तिच्यावर मागील सहा ते सात महिन्यांपूर्वी (वेळ व तारीख नक्की आठवत नाही) बळजबरीने तिच्यावर अत्याचार केल्याचा व मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आरोप पीडीतेने करीत वडिलांविरोधात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. घडल्या प्रकाराची माहिती आईला दिल्यानंतर तिनेदेखील पतीची बाजू घेत तु माझ्या पतीला बदनाम करीत असल्याचे सांगितल्याचे पीडीतेने तक्रारीत नमूद केले आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करीत आहेत.


