अनोळखी तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू


Unidentified youth dies after falling from running train जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनच्या डाऊन लाईनवर सकाळी धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू ओढवला. तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

धावत्या रेल्वेतून पडल्यो मृत्यू
जळगाव रेल्वे स्टेशनच्या डाऊन लाईनवर गंध्या नाल्याजवळ धावत्या रेल्वेतून गुरुवार, 19 जानेवारी रोजी सकाळी 7.25 वाजेपूर्वी अनोळखी तरुण पडला. या तरुणास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवला आहे. ही घटना जळगाव रेल्वे स्टेशन येथे खांबा क्रमांक 420/ 29 ते 420 / 31 चे मध्ये डाऊन मेन रेल्वे लाईनजवळ घडली आहे. मयत तरुणाचे अंदाजे 27 वर्ष वय असून केस काळे, रंगाने गोरा, शरीर बांधा सडपातळ उंची 5 बाय 5, अंगात कळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व डॉलर कंपनीची निळ्या रंगाची अंडरवेअर परीधान केलेली आहे. याबाबत डीवायएसएस एस.एस.ठाकूर यांच्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलीस चौकीत नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार सचिन कुमार जगदीश भावसार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !