अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले : अज्ञाताविरोधात गुन्हा


A minor girl was seduced and abducted : Crime against unknown जळगाव : जळगाव शहरातील कानळदा परीसरातल 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत बुधवारी रात्री 9 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील कानळदा रोड परीसरातील एका भागात 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजता अल्पवयीन मुलगी घरी असतांना एका अज्ञात व्यक्तीने दिला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून न आल्याने अखेर बुधवारी रात्री 9 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !