वस्तू खरेदी करताना जळगावात महिलेचा विनयभंग : तिघांविरोधात गुन्हा
Woman molested while buying goods in Jalgaon: Crime against three जळगाव : वस्तू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा जळगावात विनयभंग करण्यात आला. बुधवारी रात्री 10 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील एका भागात 42 वर्षीय महिलाही आपल्या परवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजता महिला ह्या त्यांच्या मैत्रिणी सोबत जळगाव शहरातील एका भागात वस्तू खरेदीसाठी आल्या होत्या. वस्तू खरेदी करत असताना संशयीत आरोपी रईस युसूफ बागवान, नबील आसिफ बागवान आणि शिबान रईस बागवान (तिघे रा.जळगाव) यांनी महिलेकडे वाईट हेतूने बघून धक्काबुक्की व लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने मैत्रिणीसोबत जळगाव शहर पोलीस ठाणे गाठत तिघांविरोधात तक्रार दिलयाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे.


