‘चम चम चमको’ बालनाट्य द्वितीय ; भुसावळात विद्यार्थ्यांचा गौरव
भुसावळ : शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाद्वारा व संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चमचम चमको’ हे बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर करण्यात आले. या बालनाट्यास द्वितीय पारीतोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केल्यानंतर बालनाट्य चमूतील कलावंत विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष सोनू मांडू यांनी नुकताच गौरव केला.
शाळेच्या गौरवात भर
यासोबत दिग्दर्शनाचे द्वितीय पारीतोषिक शाळेतील शिक्षिका सोनाली वासकर तर उत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक पियुषा महाजन आणि अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र गायत्री भोसले या सर्वांना ‘चमचम चमको’ या बालनाट्यसाठी मिळाले. राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून 19 बालनाट्य सादर करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे, संस्थेचे पालक बापूसाहेब मांडे, संस्थेच्या सचिव उषाताई पाटील यांनी बालनाट्य चम्मूंचे कौतुक करून अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक संजीव पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंदांतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.


