दहिगावला मेडीकल दुकानाचे शटर्स वाकवुन 16 हजारांचा ऐवज लांबवला


यावल : तालुक्यातील दहिगाव येथील गावातील औषधीच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी शटर्स वाकवून 16 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
दहिगाव, ता.यावल येथे न्यू परीमल मेडिकल स्टोअर्स या औषधीच्या दुकानातून चोरट्यांनी दोन हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व 13 हजारांची रोकड लांबवली. या संदर्भात महेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण पोलीस करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !