लव जिहाद कायदा लागू करण्यासाठी एवढी दिरंगाई का
भुसावळातील शिशिर जावळे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भुसावळ : संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी काही धर्मांधानी समाज आणि धर्म कंटक प्रवृत्तींनी, जबरदस्तीने युवतींसह महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांना वाम मार्गाला लावून मग नंतर त्यांची हत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत व येत आहेत. भारतात लव जिहाद पसरविण्यापासून अशा धर्मांधाना व समाज विघातक प्रवृत्तीना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने त्वरीत विलंब न लावता लवजिहादविरुद्धचा कायदा मंजूर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे. शिंदे सरकारचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने हा कायदा करण्यास शिंदे सरकारला वेळ का लागत आहे? एवढी दिरंगाई का होत आहे?? असा सवाल जावळे यांनी उपस्थित केला आहे.
सहनशीलतेचा अंत पाहू नये
हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे पत्राद्वारे जावळे यांनी म्हटले आहे. या कायद्यात एखाद्या व्यक्तीने विवाह करण्याच्या नावाखाली जबरदस्तीने जर एखाद्या महिला युवतीचे धर्मांतर करण्यास तिला भाग पाडले तर अशा व्यक्तीसाठी कमीत कमी 20 वर्षाची सक्तमजुरीची काळ्या पाण्याची शिक्षेची तरतूद या कायद्यात असावी तसेच संबंधित व्यक्तीला देशद्रोही विघातक कार्य करणारा व जातीय तेढ निर्माण करणारा म्हणून घोषित करण्यात यावे, तसेच जबरदस्तीने धर्म परीवर्तन करून केल्या जाणार्या विवाहांना शून्य समजण्यात यावा, जबरदस्तीने धर्मांतर करून विवाह करण्यास भाग पडणार्या व्यक्तीला कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

