राज्य अर्थसंकल्पाने केली घोर निराशा : ओबीसी घटकालाही डावलले
भुसावळातील माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचा पत्रकार परीषदेत आरोप
The state budget was a big disappointment : OBCs were also left out भुसावळ : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठ-मोठ्या घोषणा केल्या मात्र ओबीसी घटकांवर सरकारने अन्याय केला असून या अर्थसंकल्पाने निराशाच केल्याचा दावा भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा उमेश नेमाडे यांनी शुक्रवारी दुपारी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रपरीषदेत केला. नेमाडे म्हणाले की, या अर्थ संकल्पात ओसीबीसी घटकाला हेतू पुरस्कार डावलून दुबळे करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
जातीय जनगणनेसाठी सकारात्मकता नाही
उमेश नेमाडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची गरज दहावी, बारावीनंतर असतानाही सरकारने दुर्लक्ष केले शिवाय जातीय जनगणना करण्यासाठी होण्यासाठी कुठलीही सकारात्मकता दाखविली जात नाही. हा एक प्रकारे अन्याय असून ओबीसींनी आवाज उठविल्यावर महाज्योती योजना राबविली जात आहे. यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा मोलाचा आहे. अर्थसंकल्पात रोजगारासाठी घोषणा नाहीत शिवाय एमआयडीसीबाबत काहीही सकारात्मकता नाही. दुसरीकडे उद्योग नगरी निर्माण होत असून येथे मात्र काहीही प्रकल्प देण्यात आलेले नाही. सरकार शेतकर्यांना सहा हजार रुपये देणे म्हणजे शेतकर्यांची जणू थट्टाच केली जात आहे. सरकारने शेतकर्याच्या शेती मालाला भाव देण्याची गरज आहे. मात्र त्याकडे सुध्दा लक्ष दिले जात नाही.

भुसावळकरांच्या पदरी निराशाच
अर्थसंकल्पाकडून भुसावळकरांनाही मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्याही फोल ठरल्याचे नेमाडे म्हणाले. भुसावळ बसस्थानकासह पोलिस प्रशिक्षण केंद्र, शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे तसेच नाट्यगृहाचा प्रलंबित प्रश्नाबाबत काही घोषणेची अपेक्षा होती मात्र तीदेखील फोल ठरली. हे सरकार हिंदुत्वाचे सरकार असल्याचे सांगते मात्र स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कुठलाही प्रकल्प जाहीर केलेला नाही शिवाय इंधनाच्या दरातही कपात न झाल्याने सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पात डावलण्यात आल्याचे नेमाडे म्हणाले.
