आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल पक्षातून निलंबित


जळगाव : शहरातील बौद्ध वसाहतीत महापुरूषांच्या पुतळा हटवण्याबाबत आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांना पक्षातून एक वर्षांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे व जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी सोमवार, 10 रोजी काढले आहेत.

अडकमोल यांचे वर्तन समाजहिताच्या विरोधात असून सातत्याने ते पक्ष नेतृत्वाच्या विरोधात वागत असल्याने तसेच पुतळे हटवल्याप्रकरणी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाल्याने त्याचा परीणाम पक्ष वाढीवर होणार असल्याने आरपीआय आठवले गटातून अडकमोल यांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे मकासरे यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !