चोरट्यांना उरला नाही देवाचा धाक : मारोतीरायाच्या मंदिराबाहेरून दुचाकी लांबवली
जळगाव : जळगाव तालुक्यातील आमोदा बुद्रुक गावातून एका तरुणाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. साबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
सागर नाना ठाकरे (25, आमोदा बुद्रुक) या तरुणाने बुधवार, 5 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास त्याने त्याची दुचाकी (एम.एच.19 सी.क्यू.1629) ही गावातील मारुती मंदिराजवळ पार्क केली मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्याने 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर सोमवारी सायंकाळी पाच वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीलाल पाटील करीत आहे.
