विदगावातील विवाहितेचा विनयभंग करीत पतीला ठार मारण्याची धमकी : चौघांविरोधात गुन्हा
Threatening to kill husband by molesting married woman in Vidgaon: Crime against four जळगाव : तालुक्यातील विदगावात 34 वर्षीय महिलेचा विनयभंग करीत शिविगाळ करून पतीलादेखील जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाणीचा जाब विचारताच केला विनयभंग
34 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, रविवारी दुपारी अडीच वाजता संशयित घराजवळून दुचाकीवरून जाताना दिसल्याने महिलेने पतीला मारहाण का केली? असा जाब विचारल्यानंतर संशयित भगवान कोळी, प्रकाश कोळी, बापू बाविस्कर आणि पवन कोळी यांनी विनापरवानगी महिलेच्या घरात प्रवेश करीत तुझा पती कुठे आहे, आम्ही त्याला सोडणार नाही, असे सांगून महिलेला शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला तसेच तिच्या पतीला सोडणार नाही, अशी धमकीदेखील दिली. या संदर्भात महिलेने सोमवार सायंकाळी सात वाजता जळगाव तालुका पोलिसात संशयित आरोपी भगवान कोळी, प्रकाश कोळी, बापू बाविस्कर आणि पवन कोळी या चौघांवर गुन्हा दाखल केला. तपास सहायक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.
