जळगावच्या नशेमन कॉलनीतून 15 हजारांची रोकड लांबवली
15,000 cash was extended from Nasheman Colony of Jalgaon जळगाव : शहरातील नशेमन कॉलनीत उघड्या घरातून भर दिवसात चोरट्यांनी 15 हजारांची रोकड व एटीएम कार्ड लांबवल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी मंगळवारी रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
उघड्या घरातून लांबवली रोकड
हिसाहक इब्राहिम रंगरेज (70, नशेमन कॉलनी, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सोमवार, 10 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांचे घर उघडे असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील दोन बॅग पर्स लांबवल्या. त्यात 15 हजारांची रोकड, युनियन व गोदावरी बँकेचे एटीएम कार्ड तसेच महावीर व युनियन बँकेचे पासबुक होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हिसाहक रंगरेज यांनी मंगळवारी रात्री 10.15 वाजता एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.
