धावत्या रेल्वेखाली झोकून देत कामगाराची आत्महत्या : मयत चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी
Centering worker of Bahal committed suicide in front of railway in Jalgaon जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावातील 42 वर्षीय सेंट्रींग कामगाराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, 11 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हरुण अब्दुल पिंजारी (42, रा.बहाळ) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात नोंद करण्यात आली.
आसोदासह बहाळ गावात शोककळा
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ या गावातील मूळ रहिवासी हरुण पिंजारी हे रोजगारानिमित्ताने त्यांचे सासर असलेल्या जळगाव तालुक्यातील आसोदा या गावात इंदिरानगरात पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास साईटवर काम करणार्या एका कामगाराची दुचाकी घेवून ते बाहेर पडले मात्र उशीरापर्यंत घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरू असतानाच. तरसोद जवळ रेल्वे खांबा क्रमांक 425/30-23 या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळला. माहिती कळताच सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खिशात असलेल्या आधारकार्डवरुन मयत हे हरुण पिंजारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी रेल्वे पुढे झोकून देत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे करीत आहेत. मयत पिंजारी यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.
