तामसवाडीतील माहिती अधिकार कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला


पारोळा : तामसवाडी येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत तर संशयिताने देखील आपल्याकडे 50 हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत माहिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्यावर हल्ल्याचा आरोप
या प्रकरणी राहुल देविदास सरदार यांनीदेखील हेमंत मच्छिंद्र पवार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण व जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. गावाजवळील मारोती मंदिराजवळ सोमवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. संशयीताने कंबरेला लावलेल्या कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप असून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारून फेकल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास उपअधीक्षक राकेश जाधव करीत आहेत. दरम्यान, हेमंत उर्फ नाट्या मच्छींद्र पवार (20, तामसवाडी) यांनीदेखील संशयित राहुल देविदास सरदार (40, तामसवाडी) याने पोलिसात दिलेला अर्ज मागे घेण्यासाठी 50 हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तपास हवालदार विजय भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !