भुसावळातील विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ : पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा


Harassment of married woman in Bhusawal for two lakhs : Crime against six persons including husband भुसावळ : माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने शहरातील माहेर व सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सहा संशयितांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा संशयीतांविरोधात गुन्हा
निकहत जहाँ मसूद रजा शेख (24, ग्रीन पार्क, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 15 ऑगस्ट 2018 ते 13 जून 2019 दरम्यान, पतीसह आरोपींनी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून छळ केला व मागणी पूर्ण न केल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी पती मसूद रजा अब्दुल हमीद शेख, सासू जैनब बी अब्दुल हमीद, नणंद जमीला शेख अनिस, जेठ नईम अब्दुल हमीद शेख (सर्व रा.ग्रीन पार्क, बिस्मिल्ला चौक, गल्ली नंबर तीन, भुसावळ), मोठी नणंद परवीन बी.मोहम्मद खलील शेख (कुर्ला, मुंबई), छोटी नणंद साजीया बी.नजमोद्दीन शेख (विक्रोळी मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुमन राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !