आमदगावच्या तरुण शेतकर्याने कर्जापुढे टेकले हात : शेतात केली आत्महत्या
Farmer’s son of Amdgaon commits suicide due to debt बोदवड : तालुक्यातील आमदगाव गावातील 20 वर्षीय शेतकरी पूत्राने कर्ज डोईजड झाल्याने शेतात गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पवन नारायण राणे (20) असे मयत तरुणाचे नाव आहे. संजय मुकूंदा कोलते यांच्या आमदगाव शेती शिवारातील लिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने पवनने गळफास घेतला.
कर्जापुढे हात टेकत आत्महत्या
मयत पवन राणे हा घरातील एकमेव कमावता मुलगा होता. त्याचा लहान भाऊ यास अर्धांगवायू आजाराने पछाडले आहे तर वडिलांवर एचडीएफसी बँकेचे सात एकर शेतीसाठी साडेचार लाखांचे कर्ज आहे व कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी पूत्राने आत्महत्या केली. मयताचे मेहुणे उमेश वसंत नारखेडे यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक सचिन चौधरी करीत आहे.
