पुणे-मुंबई महामार्गावरील घाटात खाजगी बस दरीत कोसळली : 13 प्रवासी ठार ; अनेक जखमी
A private bus fell into a ravine at a ghat on the Pune-Mumbai highway : 13 passengers were killed; Many injured खोपोली : ढोल-ताशा पथकातील कलाकारांनी घेवून निघालेली बस पाचशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले. हा अपघात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडला. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परतीच्या प्रवासता क्रुर काळाचा घाला
या बसमध्ये बसमध्ये सह मुली व 40 मुले असल्याची माहिती असून सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झांज पथक ऑर्डर मिळाल्याने पिंपरी-चिंचवडला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर तेथून रात्री एकच्या ते मुंबईला परतत असताना अपघात घडला.

खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची उपचारासाठी धाव
घटनास्थळी मदतकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्यातील कार्यक्रम संपवून हे सर्वजण परत जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. या अपघातातील बस गोरेगावातील सुखकर्ता ट्रॅव्हल्सची व अपघातग्रस्त सतीश धुमाळ ढोल ताशा पथकातील कलाकार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अपघातात जुई सावंत (15, गोरेगाव) सह अन्य 12 प्रवाशांचा मृत्यू ओढवला असून अन्य अनेक जण जखमी झाले आहेत.