राज्यात सर्वाधिक हॉट भुसावळच : पुन्हा पारा 43.3 अंशावर


Bhusawlach is the hottest in the state : mercury again at 43.3 degrees भुसावळ : राज्यात सर्वाधिक हॉट शहर म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराचा पारा बुधवारी तब्बल 43.3 अंशावर नोंदवण्यात आल्यानंतर शुक्रवारीदेखील पुन्हा पारा 43.3 अंशावर पोहोचल्याची माहिती शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने दिली.

दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य
सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी शहराचे किमान तापमान 29.6 तर कमाल तापमान 43.3 राहिले. आगामी काळात शहराचे तापमान आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे. तापमानवाढीमुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनूष्य होत असून सायंकाळी उशिरानंतरच नागरीक घराबाहेर पडत आहे. तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचताच अंगाची लाहीलाही होत असून दुसरीकडे शीतपेयांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. तापमानाचा पारा आणखीन वाढण्याची भीती आहे. वाढत्या उन्हामुळे आईसक्रीम, ऊसाचा रस, मठ्ठा आदी शितपेयांना मागणी वाढली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !